Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

Job News : तरुण वर्गासाठी नोकरीची सुवर्णसंधी; CIDCO देणार चांगला पगार, अन् पद... पाहा कामाची बातमी

CIDCO Job News : शिक्षणाचा टप्पा ओलांडल्यानंतर आता चांगल्या नोकरीच्या क्षेत्रात आहात? शासकीय आणि निमशासकीय आस्थापनांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी हवीय? ही बातमी तुमच्यासाठी...   

Job News : तरुण वर्गासाठी नोकरीची सुवर्णसंधी; CIDCO देणार चांगला पगार, अन् पद... पाहा कामाची बातमी

CIDCO Job News : कॉर्पोरेट क्षेत्रातील (Corporate jobs) अनेकांचेच नोकरीचे भयावह अनुभव ऐकल्यानंतर बऱ्याच नोकरदारांनी त्यांचा मोर्चा (Government jobs) सिडको आणि तत्सम प्रशासकीय आस्थापनांच्या वळवला. पगार, पद, सुट्ट्या आणि तुलनेनं नोकरीच्या ठिकाणी असणारं सकारात्मक वातावरण या कारणास्तव आताच्या घडीलासुद्धा अनेकजण अशा आस्थापनांमध्ये विविध पदांवरील नोकऱ्यांच्या शोधात आहेत. या सर्वच मंडळींसाठी CIDCO नं अखेर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्याचा फायदा भविष्यात तरुण वर्गाला होताना दिसणार आहे. 

भरती प्रक्रियेचा एक टप्पा पार पडला?

गृहविकास आणि शहररचना या क्षेत्रांमध्ये भरिव योगदान देणाऱ्या सिडको महामंडळामध्ये गेल्या बऱ्याच काळापासून मनुष्यबळाचा तुटवटा जाणवत असल्यानं अखेर नव्यानं नोकरभरती प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. नुकतीच या धर्तीवर 160 पदांसाठी ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा पार पडली असून, यामध्ये सहायक विकास अधिकारी आणि अभियंता संवर्गातील 130 पदांसाठीच्या ऑनलाईन परीक्षांचाही समावेश होता. 

सिडकोमध्ये किती रिक्त जागा?

दरम्यान सिडकोकडून येत्या काळात इतरही रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असून, टप्प्याटप्प्यानं रिक्त पदांवर नव्यानं उमेदवारांना संधी दिली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. उपलब्ध माहितीनुसार सिडकोमध्ये सध्या 2797 पदांपैकी 1619 पदं रिक्त असून त्यामुळं सेवेत असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. परिणामी सातत्यानं कर्मचारी संख्या वाढवण्याची मागणी होत असल्यानं आणि कामाचा वाढता व्याप पाहता सिडकोकडून लवकरच नोकरभरती प्रक्रिया घेतली जाणार आहे. जिथं आवश्यकतेनुसार रिक्त पदांवरील भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. 

हेसुद्धा वाचा : Mumbai Crime : मुंबई हादरली! 35 वर्षीय शेजाऱ्याकडून 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पार्किंग लॉटमध्ये घेऊन गेला अन्...

गेल्या काही वर्षांमध्ये नवी मुंबई आणि नजीकच्या क्षेत्रांमध्ये कैक प्रकल्प सिडकोनं हाती घेतले असले तरीही त्या तुलनेत मनुष्यबळाचा आकडा मात्र अतिशय कमी असल्यामुळं भरती करणं हाच पर्याय आता सिडको अवलंबला जाणार आहे हेच स्पष्ट होत आहे. 

Read More