Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

गृहिणींना दिलासा! वाटाणा, गाजर,फ्लॉवरचे दर नियंत्रणात, जाणून घ्या मंडईतील भाव

Navi Mumbai News Today: भाजीपाल्याचे दर नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली आहे. बाजारपेठेच काय आहेत भाज्यांचे दर

गृहिणींना दिलासा! वाटाणा, गाजर,फ्लॉवरचे दर नियंत्रणात, जाणून घ्या मंडईतील भाव

Navi Mumbai News Today: नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच भाजीपाल्याचे दर कमी झाले आहेत. आवक वाढल्याने भाजीपाल्याच्या दरात नियंत्रण येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. वाटाणा, गाजर, टोमॅटो, फ्लॉवरसह अनेक वस्तुंचे दर नियंत्रणात आले आहेत. तसंच, बाजार समितीमध्ये संक्रांतीमुळं दोन दिवसात गाजराची विक्रमी आवक झाली आहे. 

सोमवारी ४०१ टन व मंगळवारी ३०१ टन, तर फ्लॉवरचीही दोन दिवसात ७८० टन आवक झाली आहे. याशिवाय टोमॅटोची दोन दिवसात ४६० टन आवक आला आहे. पालेभाज्यांचे दरही नियंत्रणात आले आहेत. बाजार समितीमध्ये ७ ते १० व किरकोळ मार्केटमध्ये २० रुपये जुडीप्रमाणे भाजी उपलब्ध होत आहे. 

भाजी         होलसेल         किरकोळ
वाटाणा          ३२ ते ३६      ५० ते ६०
गाजर             २४ ते ३६      ४० ते ५०
टोमॅटो            ८ ते १५        ३० ते ४०
दुधी भोपळा    १२ ते २४    ५० ते ६०
फरसबी          ३० ते ४०     ७० ते ८०
फ्लॉवर           ६ ते ८        ३० ते ४०
घेवडा            १२ ते १६    ४० ते ५०
काकडी          १० ते २४     ४० ते ५०
कारली          २४ ते ३४     ४० ते ५०

घाऊक महागाई दर २.३७ टक्क्यांवर

वस्तु, कंपनी उत्पादन, इंधन आणि ऊर्जा यांची दरवाढ झाल्याने घाऊक महागाईने डिसेंबर महिन्यात २.३७ टक्क्यांचा टप्पा गाठला. नोव्हेंबरमध्ये ही महागाई १.८९ टक्के होती. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात ही महागाई ०.८६ टक्के होती, तर यावर्षीच्या ऑक्टोबरमध्ये ती २.७५ टक्के होती. अन्नपदार्थांच्या किमतीत किंचित घट झाली, तरी इतर बाबींची भाववाढ झाल्यामुळे ही महागाईही वाढल्याचे सरकारी आकडेवारीत स्पष्ट करण्यात आले आहे.

Read More