Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

स्वत:च्याच रायफलने गोळी मारुन भारतीय जवानाचा मृत्यू

याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

स्वत:च्याच रायफलने गोळी मारुन भारतीय जवानाचा मृत्यू

मुंबई : भारतीय नौदलातील एका जवानाने गुरुवारी कथितरित्या स्वत:ला गोळी मारुन घेतल्याची घटना घडली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नौदलातील २५ वर्षीय अखिलेश यादव यांनी आयएनएस आंग्रेमध्ये रायफलने स्वत:ला गोळी मारली.

या घटनेनंतर त्यांना तात्काळ आयएनएचएस असविनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. कुलाबा पोलीस आणि नौसेना अधिकारी याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

अखिलेश यादव यांच्याच सर्व्हिस रायफलमधून गोळी चालविण्यात आली होती. परंतु हा अपघाती गोळीबार होता किंवा अन्य काही प्रकरण आहे? याबाबत कोणताही खुलासा झालेला नाही. 

Read More