Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

'डॉ. पायल आत्महत्या प्रकरण तपासात जाणीवपूर्वक निष्काळजीपणा'

डॉ. पायल आत्महत्या प्रकरणाच्या तपासात पोलीस जाणीवपूर्वक निष्काळजीपणा करण्यात येत असल्याचा आरोप 

'डॉ. पायल आत्महत्या प्रकरण तपासात जाणीवपूर्वक निष्काळजीपणा'

मुंबई : नायर हॉस्पिटलमधील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाच्या तपासात पोलीस जाणीवपूर्वक निष्काळजीपणा करण्यात येत आहे, असा गंभीर आरोप डॉ. तडवी कुटुंबीयांच्या वकिलांनी केला आहे. पोलिसांना अजून ठोस पुरावे सापडलेले नाहीत, असे अॅड. नितीन सातपुते यांचं म्हणणे आहे.

दरम्यान, डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी तिन्ही आरोपी डॉक्टरांना आंशिक कोठडी देण्यात आली. आज दुपारी २ ते ६ आणि शुक्रवार शनिवारी दुपारी २ ते ६ या वेळेतच या डॉक्टरांची पोलीस कोठडीत चौकशी करण्यात येणार आहे. डॉ. भक्ती मेहेरे, डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. हेमा अहुजा या तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी गुन्हे शाखेने केली होती. त्यावर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. १० जूनपर्यंत आरोपींची न्यायालयीन कोठडी कायम ठेवण्यात आली आहे. 

Read More