Mumbais new Jogeshwari Terminus: लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्यासाठी आता मुंबईत आणखी एक टर्मिनल होणार आहे. जोगेश्वरी टर्मिनलचे काम अंतिम टप्पात असून येत्या डिसेंबरपर्यंत हे टर्मिनल प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. सध्या जोगेश्वरी येथे या टर्मिनसचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या टर्मिनसच्या कामाची पाहणी अलीकडेच खासदार रवींद्र वायकर यांनी केली. तेव्हा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हे अश्वासन दिले आहे.
अमृत भारत या योजनेच्या माध्यमातून देशातील विविध रेल्वे स्टेशनचे काम हाती घेण्यात आली आहे. त्याच योजनेअंतर्गंत जोगेश्वरी टर्मिनलचे काम हाती घेण्यात आले आहे. टर्मिनसचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असून सुरुवातीला दोन प्लॅटफॉर्म सुरू करण्यात येणार आहेत. जोगेश्वरी टर्मिनसमध्ये एकूण 3 प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार आहेत. येथे लिफ्ट, सरकते जिने, अंडरगाउंड पार्किंगची सुविधा, सोलर, मेट्रोची कनेक्टिव्हीटी अशा सुविधा आहेत. तसंच, या ठिकाणी मल्टीमोडेल कनेक्टिव्हिटी सुविधाही करण्यात येण्याची शक्यता आहे.
चाकरमान्यांना लांब पल्ल्याची गाडी पकडण्यासाठी थेट कुर्ला, मुंबई सेंट्रल किंवा सीएसएमटीपर्यंत जावे लागते. तसंच, या टर्मिनसवरुन 12 लांब पल्ल्यांच्या गाड्या स्थलांतरित होऊ शकतात. त्यामुळं उपनगरीय रेल्वे मार्गावरील ताण कमी होण्यास मदत होईल. तसंच, या टर्मिनसवरुन 24 डब्याच्या रेल्वे गाड्यादेखील चालवता येऊ शकतात असे फलाट निर्माण करु शकतात. जोगेश्वरी रेल्वे टर्मिनस हे मुंबईतील सातवे टर्मिनस असणार आहे. पश्चिम रेल्वेवरील राम मंदिर रेल्वे स्थानक आणि जोगेश्वरी टर्मिनस यांच्यामधील अंतर सुमारे 500 मीटर आहे. दोन स्थानकांच्या मधेच हे स्थानक होत आहे.
बेट आणि होम प्रकारचे एकूण 2 प्लॅटफॉर्म आणि 3 मार्गिका या नव्या टर्मिनसमध्ये असणार आहे. दोम मजली सेवा इमारती आणि पाच मजली स्टेशन इमारत असणार आहे. त्याचबरोबर, मेट्रो मार्ग 7, मेट्रो मार्ग 2अ, आणि मेट्रो मार्ग 6च्या प्रवाशांना मिळणार लांब पल्ल्याच्या ट्रेन्सपर्यंत कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.