Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

नववर्षानिमित्त भाविकांची सिद्धीविनायक, शिर्डी, शेगावला दर्शनासाठी रिघ

मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केलीय. नवीन वर्षाची सुरूवात सिद्धिविनायकाच्या दर्शनानं

नववर्षानिमित्त भाविकांची सिद्धीविनायक, शिर्डी, शेगावला दर्शनासाठी रिघ

मुंबई : मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केलीय. नवीन वर्षाची सुरूवात सिद्धिविनायकाच्या दर्शनानं व्हावी यासाठी अनेक भाविक दरवर्षी प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात येतात. यंदाही मोठया संख्येनं भाविक रात्रीपासूनच मंदिरात दाखल झाले. 

भाविकांची शिर्डीच्या साई मंदिरात हजेरी

नववर्षांचं स्वागत मंगलमय वातावरणात करण्यासाठी लाखो भाविकांनी शिर्डीच्या साई मंदिरात हजेरी लावलीय. यावेळी साईंचं मुखदर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केलीय. 

नवीन वर्ष साईंच्या सानिध्यात घालवताना भजन-किर्तनात साईभक्त तल्लीन होताना दिसले. बालगोपाळ , वृद्ध आणि तरूण अशा सर्वच वयोगटातील भाविकांची मांदियाळी याठिकाणी दिसून आली. विशेष म्हणजे दर्शनासाठी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं होतं. 

Read More