Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

नितिन देशमुख यांचा स्वतःहून सूटका केल्याचा दावा खोटा? खासगी विमानाने अकोल्यात परतले

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 42 आमदारांनी शिवसेनेतून बंड पुकारून वेगळा गट स्थापन केला. परंतू   आमदारांना बळजबरीने सूरत आणि गुवाहाटीला नेल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. 

नितिन देशमुख यांचा स्वतःहून सूटका केल्याचा दावा खोटा? खासगी विमानाने अकोल्यात परतले

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 42 आमदारांनी शिवसेनेतून बंड पुकारून वेगळा गट स्थापन केला. परंतू   आमदारांना बळजबरीने सूरत आणि गुवाहाटीला नेल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. 

शिंदे गटातून निसटलेल्या आमदार कैलास पाटील (Kailas Patil) आणि आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांना आज शिवसेनेने (Shivsena) मीडियासमोर आणलं. यावेळी आपल्याला फसवून सूरतला नेण्याच आल्याचा आरोप करत कंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी आपल्या सुटकेचा थरार मीडियाला सांगितला. परंतू नितिन देशमुख यांचे आरोप खोटे असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. 

fallbacks

आमदार नितीन देशमुखांचा यांनी मी स्वतःची सुटका करून पळून आलो. हा दावा खोटा असल्याचे शिंदे गटाने म्हटलंय. नितिन देशमुख यांचा गुवाहाटी ते अकोला हा परतीचा प्रवास खाजगी विमानाने झाला. एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांनी सन्मानाने त्यांना अकोल्याला पोहोचवले त्याचे पुरावे म्हणून फोटो त्यांनी सादर केले. त्यामुळे नक्की खरं कोण बोलतंय असा सवाल उपस्थित होत आहे.

हे देखील वाचा : त्या दिवशी नेमकं काय घडलं! शिंदे गटातून निसटलेल्या आमदाराने सांगितला सुटकेचा थरार

fallbacks

Read More