India-Pakistan War: मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या नियमात काही बदल करण्यात आले आहेत. सध्या सुरु असलेल्या भारत-पाकिस्तानात तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कता बाळगली जात आहे. आता सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मंदिर प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव आजपासून भाविकांना हार आणि नारळ अर्पण करण्यास मनाई केली आहे. या निर्णयाला भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरापाठोपाठ शिर्डीच्या मंदिरातही हा नियम लागू करण्यात आला आहे. शिर्डीमध्ये आजपासून हार, फुलं, प्रसाद नेण्यास बंदी असणार आहे. शिर्डी साई संस्थाननं हा निर्णय घेतला आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवरच शिर्डी साई संस्थाननं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. साईबाबा संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची माहिती दिली. या संदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी साईबाबा संस्थांनसह बैठक घेतली. या बैठकीनंतर मंदिर परिसरात पाहणी करण्यात आली. त्यानंतर आगामी धोका लक्षात घेता साईबाबा संस्थानने हार फुलं आणि प्रसाद नेण्यास मनाई करण्यात आली आहे.
धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच मंदिरात पर्स, बॅग घेऊन जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
शिवसेनेच्या एका माजी आमदारानुसार, " सुरक्षेच्या दृष्टीने, ट्रस्टने पुन्हा 20 निवृत्त सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलावले आहे. पोलीस आणि मंदिर ट्रस्ट भाविकांच्या सुरक्षेत कोणतीही कमतरता येऊ देणार नाहीत."