Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

Breaking! शंभर कोटी कथित घोटाळा प्रकरण, सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, सीबीआयने आरोपपत्र केलं दाखल

Breaking! शंभर कोटी कथित घोटाळा प्रकरण, सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

मुंबई : शंभर कोटी कथित घोटाळा प्रकरणात सीबीआयकडून (CBI) आरोप पत्र दाखल करण्यात आलं आहे. सीबीआयकडून 49 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. माजी गृह मंत्री अनिल देशमुख, कुंदन शिंदे, संजीव पालांडे यांच्या विरोधात हे आरोपपत्र आहे. या प्रकरणात सचिन वाझे ला माफीचा साक्षीदार होण्याच्या करिता विशेष सीबीआय कोर्टाने मान्यता दिली आहे.

सचिन वाझे यांचं आरोपपत्रात नाव नाही
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे माफिचा साक्षिदार झाल्याने आरोपपत्रात सचिन वाझेचं नाव नाहीए. मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणात कोठडीत असणार्‍या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचा माफीचा साक्षीदार होण्यासाठीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून मंजूर करण्यात आला आहे. 

100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांच्याविरोधात माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी सचिन वाझेने  दर्शवली होती. यासाठी सचिन वाझेने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जाला अटी-शर्तींसह मंजुरी देण्यात आली. 
 
त्यामुळे 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read More