Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

'हिंदी किंवा भोजपुरीतच...'; विरारमध्ये रिक्षाचालक-तरुणामध्ये वाद

मुंबईत मराठी भाषेच्या समर्थनार्थ मनसे आक्रमक झाले असताना दुसरीकडे विरारमध्ये रिक्षाचालक-मराठी तरुणामध्ये वाद समोर आला आहे.   

'हिंदी किंवा भोजपुरीतच...'; विरारमध्ये रिक्षाचालक-तरुणामध्ये वाद

मराठी अस्मिता आणि मराठी भाषा या मुद्द्यांवर मुंबईतील मीरा भाईंदरमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेना आक्रमक झाल्याच पाहिला मिळत आहे. मनसे आणि शिवसेनेच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले आहेत. कार्यकर्ते मोर्चावर ठाम असून पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. अशातच दुसरीकडे विरारमध्ये रिक्षाचालक-तरुणामध्ये वाद झालाच पाहिला मिळालं. तरुण हिंदीमध्ये न बोलल्याने रिक्षाचालकाने दमदाटी केली. एवढंच नाही तर आपण मराठीत बोलणार नाही. तसंच आपण हिंदी किंवा भोजपुरीतच बोलणार असा आग्रह रिक्षाचालकाने धरला. 

नेमकं काय घडलं?

ग्राहकाने नेमकं काय घडलं याबद्दल झी 24 तासच्या पत्रकाराला सांगितलं. भावेश म्हणाला की, काल रात्री तो बाइकवरून आपल्या बहिणीसोबत रेल्वे स्टेशनला जात होतो. त्यावेळी मागच्या बाजूने एक रिक्षाचालक आला आणि त्याने कट मारला. त्यामुळे मी त्याला बाजूला थांबवलं. तर लक्षात आलं की, तो मद्यधुंद अवस्थेत रिक्षा चालवत होता. तर मी त्याला मराठीत म्हटलं तुला गाडी नीट चालवता येत नाही का? हे ऐकल्यावर तो रिक्षाचालक भडकला आणि मी मराठीत बोलणार नाही. त्यानंतर त्याने मला शिवीगाळ केली. मला मराठीत समजत नाही. तुला हिंदीतच बोलावं लागेल. मग तिला बोललो तुला मराठीत बोलायला काही समस्या आहे. 

तो उत्तर भारतीय असूनही मराठीसाठी...

हा वाद सुरु असताना तिथे असलेले इतर परप्रांतीय रिक्षाचालक आले आणि मला- माझ्या बहिणीला धक्काबुक्की केली असा आरोप भावेशने केला आहे. त्यानंतर त्या रिक्षाचालकाने आग्रह धरला मी हिंदी आणि भोजपुरीमध्येच बोलणार आणि तो आक्रमक झाला. विशेष म्हणजे भावेश हादेखील परप्रांतीय असनूहा तो मराठीमध्ये बोलतो. भावेशच उत्तर भारतीय असला तरी त्याचा जन्म हा मुंबईत झाला आहे. तो म्हणाला की, मी मराठी नाही पण मला गर्व आहे मी महाराष्ट्रीय असल्याचा. कारण ही माझी जन्मभूमी आहे. मी इथे शिकलो इथे मोठा झालो. मी जेवढा हिंदी बोलण्यात चांगला नाही तेवढा मी मराठीमध्ये संवाद करण्यात चांगला आहे. मी महाराष्ट्रात इतर राज्यातून येणाऱ्या लोकांना एवढंच सांगू इच्छो तो की मराठी बोलण्यास नकार देऊ नका. बोलता येत नसेल तर शिका. 

Read More