Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

'अमेरिकेच्या पापाने वॉर का थांबवली?' राऊतांचा सवाल; म्हणाले, 'मोदी, शाह ट्रम्पकडे जाऊन रडत...'

India Pakistan War Donald Trump Connection: शनिवारी सायंकाळी भारत आणि पाकिस्तानमधील शस्रसंधीची माहिती अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी दिल्यावरुन वाद

'अमेरिकेच्या पापाने वॉर का थांबवली?' राऊतांचा सवाल; म्हणाले, 'मोदी, शाह ट्रम्पकडे जाऊन रडत...'

Donald Trump Connection India Pakistan War: "अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्धामध्ये मध्यस्थी केली असं सांगण्यात येते हे चूक आहे. ट्रम्प यांच्या सूचनेनंतर भारताने युद्धबंदी स्वीकारली. डोनाल्ड ट्रम्प याचा सबंध काय? माणसं आमची मेली मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प मध्यस्थीत कोणत्या अधिकाराने करतात?" असा थेट सवाल उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला आहे. "भारत स्वतंत्र राष्ट्र आहे. ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्ध बंद करतो.  कोणत्या आधारावर आणि अटींवर बंद केलं युद्ध ते सांगा," अशी मागणी राऊतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधताना केली आहे.  

पाकिस्तानचे तुकडे कुठे गेले?

"यूक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये मोदींनी जाहिरात केली होती की, पापाने वॉर रुका दिया. अता अमेरिकेच्या पापाने वॉर थांबली का?" असा खोचक टोला राऊतांनी लगावला. "'पूर्ण बदला घेणार, पाकिस्तानचे तुकडे करणार,' ही मोदींची भाषा होती. पाकिस्तानचे तुकडे कुठे गेले?" असा सवाल राऊतांनी विचारला. "भारताची जगामध्ये बेअब्रू झालेली आहे. "पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट आलं आहे, आम्ही युद्ध जिंकलो. अकलेचे दिवे पाजळणाऱ्या भारताच्या प्रधानमंत्र्यांना हे शोभत नाही," असंही राऊत म्हणालेत.  

ट्रम्पसाठी सैन्याचे आणि देशाचे मनोबल उध्वस्त केलं

"कोणत्या अटी शर्ती वर तुम्ही युद्ध थांबवलं यासाठी सर्व पक्षीय बैठक घ्यावी आणि त्या बैठकीला पंतप्रधान यांनी उपस्थित राहणार हे आवश्यक आहे. त्यांना पळ काढता येणार नाही. युद्धबंदीची खरच गरज होती का? कराचीसह इतर ठिकाणी बॉम्ब टाकले असे सांगत होते मग माघार घ्यायची गरज काय? ही वेळ पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवण्याची होती. भारतीय सैन्याचा मनोबल पण वाढले असताना देशाच्या राजकीय नेतृत्वाने अचानक कच खाल्ली. प्रेसिडेंट ट्रम्पसाठी सैन्याचे आणि देशाचे मनोबल उध्वस्त केलं," अशी टीका राऊतांनी केली. 

नक्की वाचा >> 'मोदी स्वत: स्वयंसेवक, पण...'; 'भारतीय सैन्यापेक्षा RSS स्वयंसेवक अधिक तेजस्वी'वरुन राऊतांचा टोला

ट्रम्पकडे जाऊन रडत आहेत का?

स्वतंत्र राष्ट्राच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याचा ट्रम्प यांना अधिकार काय? गुजरातचे मुख्यमंत्री मोदी असताना 26/11 हल्ल्यावेळी हे सांगत होते की ओबामांकडे जाऊन हे रडतात वाचवा म्हणून, आता मोदी, अमित शहा ट्रम्पकडे जाऊन रडत आहेत का?" असा सवाल राऊतांनी विचारला.  

अमेरिकेच्या पापाने वॉर का थांबवली?

"अमेरिकेच्या पापाने वॉर का थांबवली? हा पापा त्यांचा असेल देशाचा नाही. त्यांनी त्यांचा पापा घेत बसावं आम्हाला त्याच्याशी काही घेणेदेणे नाही. मात्र देशाची वेळ अब्रू व भावना दुखावले आहेत," असं राऊत टीकास्र सोडताना म्हणाले. 

Read More