Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार

उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार

मुंबई : पालघरच्या पोटनिवडणूक प्रचारात शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या. अखेरच्या टप्प्यात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑडिओ क्लीपवरुन दोन्ही पक्षांमध्ये घमासान सुरु असल्याचे पाहायला मिळालं.

ऑडिओ क्लिपचा वाद आता निवडणूक आयोगाकडे गेलाय. शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांविरोधात थेट मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलीय. 

मुख्यमंत्र्यांकडून आता साम दाम दंड भेदचा अर्थ शिकू असं टोला उद्धव ठाकरेंनी लगावल्यावर आता मुख्यमंत्र्यांनीही पलटवार केलाय. 

साम दाम दंड भेदचा अर्थ गरज असेल तर शिकवू असं मुख्यमंत्री म्हणाले. झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करता येत नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.

Read More