Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

तारापूर एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायुगळती, ३ कामगारांचा मृत्यू

पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायुगळती झाल्यामुळे ३ कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे.

तारापूर एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायुगळती, ३ कामगारांचा मृत्यू

पालघर : पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायुगळती झाल्यामुळे ३ कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या कामगारांची तपासणी करताना संबंधीत डॉक्टरांनाही वायूची लागण झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एस्क्वायर केमिकल कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रिया करताना वायुगळती झाली. यात तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. 

या कामगारांना औद्योगिक क्षेत्रातील तुंगा रूग्णालयात आणल्यानंतर संबंधीत रासायनिक वायुचा रुग्णालयातील इतरांनाही त्रास जाणवू लागला. कामगारांच्या मृतदेहाची तपासणी करीत असताना डॉक्टरांनाही चक्कर आल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

Read More