धक्कादायक बातमी मुंबईतून समोर आली आहे. घाटकोपर रेल्वे फलाटाच्या फटीत अडकून एका प्रवाशाचा मृत्यू झाला. मध्य रेल्वेच्या घाटकोपर रेल्वे स्टेशनवरची ही घटना आहे. हा प्रकार इतका भयानक आहे की, अंगावर काटा येते.
मुंबईत आज हजारो लोक लोकलने प्रवास करतात. मुंबईची लाईफलाईन वाटणारी ही रेल्वे काही दिवसांपासून अनेकांच्या मृत्यूच कारण बनत आहे. घाटकोपर येथे लोकल आणि फलाटाच्या फटीत प्रवासी अडकला होता. हा प्रवासी लोकलमध्ये चढताना पाय घसरून व्यक्ती पडला असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. या प्रवाशाला बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु होते. मात्र त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अद्याप या व्यक्तीची कोणतीही ओळख पटलेली नाही.
घाटकोपर स्टेशनवरील प्लॅटफाॅम क्रमांक एकवर एक व्यक्ती ट्रेन खाली अडकला.
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 13, 2025
लोकल आणि प्लॅटफ्रॉम मध्ये असलेल्या जागेमध्ये व्यक्ती अडकला.
व्यक्तीला बाहेर काढायचे शर्थीचे प्रयत्न सुरू
लोकलमध्ये चढताना पाय घसरून व्यक्ती पडला असल्याचा रेल्वे पोलिसांची माहिती.#ghatkopar #mumbai… pic.twitter.com/OEzJEs7JCh
रेल्वे अपघातात मृत्यू होत असल्याच्या बातम्या दररोज समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंब्रा येथे एक रेल्वे अपघात झाला यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर झालेल्या लोकल ट्रेन अपघातात किमान ४ जणांचा मृत्यू झाला तर १२ जण जखमी झाले आहेत. ही ट्रेन मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) वरून ठाणे येथील कसारा भागात जात होती. दिवा स्टेशन आणि मुंब्रा स्टेशन दरम्यान हा अपघात झाला. दोन्ही ट्रेनच्या फूटबोर्डवर लटकलेले प्रवासी प्रवास करत असताना, विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रेनने त्यांना धडक दिली आणि ते ट्रेनमधून खाली पडले. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी ही माहिती दिली.