Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

शेअर बाजारात मोठी घसरण, सरकारकडून इशारा, केंद्रीय मंत्री Nifty बद्दल हे काय बोलून गेले?

Share Market: केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाला ग्राहकांना चुकीचा सल्ला देणाऱ्यांना ओळखून वेगळे करण्याचे आवाहन केले.

शेअर बाजारात मोठी घसरण, सरकारकडून इशारा, केंद्रीय मंत्री Nifty बद्दल हे काय बोलून गेले?

Piyush Goyal On Stock Market Crash:शेअर बाजारातील सततच्या घसरणीदरम्यान, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे की, ज्यांनी लहान गुंतवणूकदारांना योग्य सल्ला दिला नाही त्यांच्यासाठी इशारा आहे. शनिवारी मुंबईत एएमएफआयने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, 50 शेअर्सच्या बेंचमार्क निफ्टीचे मूल्यांकन योग्य आणि संतुलित आहे.

गेल्या आठवड्यात शेअर बाजारातील मोठ्या विक्रीनंतर, वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांनी सांगितले की भारतीय बाजारपेठेत आणखी काही सुधारणा होऊ शकतात. त्यामुळे देशांतर्गत शेअर बाजारात आणखी घसरण होऊ शकते.

मार्केट आणखी पडण्याची शक्यता - पियुष गोयल

त्यांनी सांगितले की 19 च्या पीई रेशोमुळे निफ्टीचे मूल्यांकन चांगले आणि वाजवी होते. म्युच्युअल फंड उद्योग संस्था एएमएफआयने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना गोयल म्हणाले की, काही निफ्टी स्टॉक्समध्ये थोडीशी सुधारणा होऊ शकते परंतु एकूणच निफ्टी अजूनही चांगले मूल्यांकन दर्शवते.

"सर्वात वेगाने वाढणाऱ्या विकसनशील देशासाठी सध्याचे 19 च्या पीई रेशोचे मूल्यांकन वाजवी आहे," असे ते म्हणाले. तथापि, येथे अजूनही काही लहान सुधारणा होऊ शकतात. गोयल म्हणाले की, बाजारातील सध्याची घसरण ही लहान गुंतवणूकदारांना योग्य सल्ला न देणाऱ्यांसाठी एक इशारा आहे. त्याने अँफीला अशा लोकांना वेगळे करण्याचा सल्ला दिला. म्युच्युअल फंडांनी त्यांची जबाबदारी आणि वचनबद्धता सोडू नये, असेही त्यांनी सुचवले.

पियुष गोयल यांनी EU अधिकाऱ्यांची घेतली भेट 

भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांनी मुक्त व्यापार करार (FTA) अंतिम करण्यासाठी 2025 च्या अखेरीस अंतिम मुदत निश्चित केली आहे. यासोबतच, दोन्ही बाजूंच्या पथकांनी शनिवारी संतुलित आणि परस्पर फायदेशीर कराराच्या दिशेने प्रयत्नांना गती देण्यासाठी चर्चा केली. मुंबईत वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि युरोपियन युनियनचे व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयुक्त मारोस सेफकोविक यांच्यासह दोन्ही बाजूंच्या अधिकाऱ्यांमध्ये ही बैठक झाली.

"आमच्या चर्चा संतुलित आणि परस्पर फायदेशीर एफटीएसाठी प्रयत्नांना गती देण्यावर केंद्रित होत्या," असे गोयल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट केले. यामुळे आर्थिक संबंध अधिक दृढ होतील आणि भारत-ईयू भागीदारीला चालना मिळेल अशी आशा आहे.

Read More