Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मंत्रालय की 'आत्महत्या केंद्र'? वाढला पोलिसांवरचा ताण

हर्षल रावते नावाच्या व्यक्तीनं आज मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून केलेली कथित आत्महत्या... धर्मा पाटील नावाच्या शेतकऱ्यानं मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना... किंवा अविनाश शेट्येनं बुधवारी आत्महत्येचा केलेला प्रयत्न... 

मंत्रालय की 'आत्महत्या केंद्र'? वाढला पोलिसांवरचा ताण

मुंबई : हर्षल रावते नावाच्या व्यक्तीनं आज मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून केलेली कथित आत्महत्या... धर्मा पाटील नावाच्या शेतकऱ्यानं मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना... किंवा अविनाश शेट्येनं बुधवारी आत्महत्येचा केलेला प्रयत्न... 

गेल्या काही दिवसांत मंत्रालयात अशा घटना वाढल्यानं बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांवरचा ताण प्रचंड वाढलाय. 

दररोज सुमारे साडे तीन हजार सामान्य नागरिक मंत्रालयाला भेट देतात. मंगळवारी किंवा बुधवारी मंत्रीमंडळ बैठकीच्या दिवशी ही संख्या सहा हजारांच्या घरात पोहोचते. 

त्यात मंत्रालयात अचानक होणाऱ्या आंदोलनांमुळं पोलिसांची डोकेदुखी आणखी वाढलीय. 

Read More