मुंबई : भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं नाव न घेता शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी फडणवीस यांना कसलासा इशाराही दिला आहे.
रविवारी पार पडलेल्या उत्तर सभेत भाजप नेते फडणवीस यांनी शाब्दिक बाण चालवल्यानंतर सोमवारी राऊतांनी ट्विट करत त्यांना वैफल्यग्रस्त म्हटलं आहे. (Sanjay Raut Tweet On Devendra Fadnavis)
संजय राऊत यांनी भाजपवर टीका करत शिवसेनेची ताकद पाहायली असल्यास मुंबईत या, असं म्हणत विरोधकांना ललकारलं होतं. आपला पक्ष कोणापुढेही नमणार नाही, असा इशारा देत त्यांनी सर्व मनसुबे बोलून दाखवले होते. (sanjay raut )
तिथं मुख्यमंत्र्यांनीही 'देवेंद्र तुम्ही गेला असतात ना तर तुमच्या वजनाने पडली असती', अशा शब्दात बाबरीच्या मुद्द्यावरुन फडणवीसांवर टीका केली होती. या साऱ्या टीकांना फडणवीसांनी सभेदरम्यान उत्तरं दिली.
उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते.
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 16, 2022
अपघात अटळ आहे.
मी बाबरी पाडायला गेलो तेव्हा....
"मी बाबरी पाडायला गेलो होतो तेव्हा माझं वजन 128 होतं. वजनदार लोकांपासून सावध राहा", असा इशारा फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. (Bjp Shivsena)
"उद्धव ठाकरे म्हणाले फडणवीसांनी बाबरीवर पाय जरी ठेवला असता तरी बाबरीचा ढाचा खाली आला असता. केवढा विश्वास आहे बघा. माझं आजं 102 किलो वजन आहे. बाबरी पाडायला गेलो तेव्हा 128 किलो इतकं होतं. उद्धव ठाकरेंना समजेल अशा भाषेत सांगतो. सामान्य माणसाचा एफएसआय जर एक असेल तर माझा 1.5 आहे. बाबरी पाडायला गेलो होतो तेव्हा माझा एफएसआय 2.5 होता", अशा शब्दात विरोधी पक्षनेत्यांनी ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं.
तिथं फडणवीसांनी शिवसेनेचा फटकारलं आणि इथे राऊतांनी अपघात अटळ म्हणत त्यांना इशारा दिला. आता यापुढे भाजपची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणं महत्त्वाचं.