Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

धक्कादायक! दिल्लीपेक्षा मुंबईत प्रदुषणाची पातळी भयानक

 डोकेदुखी, सर्दी बरोबरच घसा खवखवणे, आवाज बसणे, घसा दुखणे यासारखा त्रास अनेकांना सहन करावा लागत आहे.  मुंबईत  हवेतील प्रदूषणाची पातळी वाढलेली आहे. 

धक्कादायक! दिल्लीपेक्षा मुंबईत प्रदुषणाची पातळी भयानक

मुंबई : मुंबईसह राज्याच्या काही भागात गेल्या काही दिवसांपासून धुक्याचे प्रमाण अधिक असलेले दिसून येते. थंडीत, धुक्यात फिरणं आल्हाददायक वाटत असलं तरी या वातावरणामुळं अनेक आजारांना निमंत्रणही मिळत आहे. 

हवेतील प्रदुषणाने मुंबईकर बेजार

कारण हे धुकं सदृश प्रदूषण असल्याचं बोलल जातंय. त्यामुळे डोकेदुखी, सर्दी बरोबरच घसा खवखवणे, आवाज बसणे, घसा दुखणे यासारखा त्रास अनेकांना सहन करावा लागत आहे.  मुंबईत  हवेतील प्रदूषणाची पातळी वाढलेली आहे. 

अगोदरच मुंबईत धुळीचे प्रमाण अधिक

जागोजागी सुरु असलेली मेट्रोची, रस्त्यांची कामे, इमारत बांधकाम यामुळं अगोदरच मुंबईत धुळीचे प्रमाण अधिक आहे, त्यातच धुक्यामुळं हे धुलिकण वातावरणाच्या खालच्या स्तरात राहत असल्याने या आजारांना निमंत्रण मिळत आहे. थंडीमुळं निर्माण झालेला हवेचा कमी दाब खोकल्याचे जंतू पसरवण्यास पोषक ठरत आहे. 

प्रदुषणाचा स्तर हा 275

दरम्यान मुंबईतलं सध्याचं प्रदूषण पाहता दिल्ली पेक्षाही मुंबईतली प्रदूषणाची परिस्थिती वाईट असल्याचं एका अहवालानुसार समोर येतय. बुधवारी एअर क्वॉलिटी इंडेक्स अर्थात हवा गुणवत्ता निर्देशांकाच्या अहवालानुसार प्रदुषणाचा स्तर हा 275 इतका होता.

दिल्लीपेक्षा मुंबईतील प्रदुषणाचा स्तर जास्त

मंगळवारी हा स्तर 271 होता. दिल्लीतला प्रदूषणाचा स्तर हा 211 इतका आहे. त्यामुळे दिल्लीपेक्षाही मुंबईतला प्रदूषणाचा स्तर हा वाढला आहे. 201 ते 300 इतका प्रदूषणाचा स्तर हा रोगप्रतिकारक शक्ती कमी असणा-यांसाठी धोकादायक मानला जातो. त्यामुळे लहान मुले आणि वृद्ध लोकांची या वातावरणात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. 

Read More