Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

लतादीदींच्या स्मृतिस्थळासाठी आमदार राम कदम यांच्याकडून ही मागणी

आमदार राम कदम यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे.

लतादीदींच्या स्मृतिस्थळासाठी आमदार राम कदम यांच्याकडून ही मागणी

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे स्मृतीस्थळ उभारण्यात यावे अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. आमदार राम कदम यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे.

भारताच्या महान गायिका लता दीदींवर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच शिवाजी पार्क मैदानावर लतादीदींचे स्मृतीस्थळ उभारण्यात यावे अशी मागणी संपूर्ण देशाची नव्हे तर जगातील कोट्यावधी संगीत प्रेमी अन लता दीदीच्या चाहत्यांची आहे.

 

लताजींचे जगभरात लाखो चाहते आहेत. त्यामुळे त्यांचे स्मृतीस्थळ उभारल्यास त्यांचे चाहते येथे येऊन त्यांचे स्मरण करतील, त्यांना आदरांजली वाहतील. लतादीदींच्या चाहत्यांच्या विनंतीचा, भावनेचा सन्मान करावा आणि त्या ठिकाणी जगताला प्रेरणा देणारे स्मृतीस्थळ उभारावे. 

शिवाजी पार्क येथे लतादीदींचे स्मृतीस्थळ उभारणे ही त्यांना अधिक योग्य श्रद्धांजली असेल, असे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

Read More