Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

Raj Kundra : राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

अश्लिल फिल्म निर्मिती प्रकरणात करण्यात आलं होतं अटक 

Raj Kundra : राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई : मुंबई क्राईम ब्रँचनं अश्लील चित्रपटांशी संबंधित प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अश्लिल फिल्म निर्मिती प्रकरणात पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्रा याला सोमवारी रात्री अटक करण्यात आली होती. (Raj Kundra Porn Case to police custody) 

राज कुंद्राला आज किला कोर्टात हजर करण्यात आलं होतं.   फेब्रुवारी 2021 मध्ये क्राईम ब्रँचनं अश्लील चित्रपट बनवणा-यांवर तसंच विशिष्ट ऍप्लिकेशनवर ते अपलोड करणा-यांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात राज कुंद्रा हा प्रमुख आरोपी असल्याची बाब तपासात समोर आली. त्यानुसार सोमवारी रात्री अकराच्या सुमारास कुंद्राला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला जे. जे. हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं. आज त्याला कोर्टात हजर करण्यात आलं आहे. 

हा व्हिडिओ अपलोड करणार्‍या उमेश कामथलाही मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. 2021 फेब्रुवारीमध्ये मुंबईत गुन्हे शाखेने अश्लील चित्रपट (soft pornography film) बनविण्याबद्दल आणि काही अ‍ॅप्सच्या माध्यमातून प्रकाशित केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. याच्या तपासणीत राज कुंद्रा यांचे नाव समोर आले आहे. त्यानंतर या प्रकरणात सोमवारी रात्री कुंद्रा याला पोलिसांनी अटक केली. तसेच व्हिडिओ अपलोड करणाऱ्या उमेश कामथ (Umesh Kamath) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

Read More