Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

अवैध बांगलादेशीप्रकरणी भाजपा आमदाराचे निवडणूक आयोगाला पत्र

पुरोहित यांनी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे.

अवैध बांगलादेशीप्रकरणी भाजपा आमदाराचे निवडणूक आयोगाला पत्र

अमित जोशी, झी मीडिया,मुंबई : आसाममध्ये लागू झालेल्या एनआरसी रजिस्टरमध्ये ४० लाख लोकांची नावं नाहीत. या मुद्दयावरून सध्या दिल्लीत राजकारण चांगलंच तापलंय. याप्रकरणी भाजपा आमदार राज पुरोहित यांनी 'झी २४ तास'ला आपली प्रतिक्रीया दिली आहे. आसामप्रमाणेच मुंबईतही  नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करण्याची मागणी भाजपचे आमदार राज पुरोहित यांनी केलीय. त्यासाठी पुरोहित यांनी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय.

भूमिकेकडे लक्ष 

 नागरिकांची पडताळणी करून अवैध वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना शोधण्यात यावं असंही पुरोहितांनी म्हटलंय. याविषयी राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेतंय हे याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.

Read More