Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

महाराष्ट्र दिन ! 'फेसबुक'नंतर राज ठाकरे घेणार इथेही एन्ट्री...

सोशल साईटपासून अंतर ठेवून राहणारे राज ठाकरे आता सोशल साईट्सवर अॅक्टिव्ह होत असल्याचे यानिमित्ताने बोललं जातंय

महाराष्ट्र दिन !  'फेसबुक'नंतर राज ठाकरे घेणार इथेही एन्ट्री...

मुंबई :  फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियावर एन्ट्री मारणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता ट्विटरवरही अॅक्टिव्ह होणार आहे. १ मे हा महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधत राज ट्विटरवर एन्ट्री करत आहेत. राज ठाकरे यांच्या पहिल्या ट्विटबाबत कमालीची उत्सुकता असली तरी त्यांचं पहिलं ट्विट महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छांचं असेल, अशी शक्यता वर्तवली जातेय. 

गेल्या वर्षी घटस्थापनेच्या दिवशी राज ठाकरे यांच्या फेसबुक पेजचा शुभारंभ झाला होता. सोशल साईटपासून अंतर ठेवून राहणारे राज ठाकरे आता सोशल साईट्सवर अॅक्टिव्ह होत असल्याचे यानिमित्ताने बोललं जातंय. 

Read More