Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

भिवंडीतील राजीव गांधी उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला

वाहतूक खोळंबली 

भिवंडीतील राजीव गांधी उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला

मुंबई : भिवंडी शहरातील राजीव गांधी उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला. भिवंडी बस स्थानकाजवळील उड्डाण पुलाचा स्लॅबचा हा भाग कोसळला आहे. महापालिकेने वेळीच दखल न घेतल्यानं ही दुर्घटना घडल्याचं समोर येतंय. आता तूर्तास उड्डाणपूल बंद केला असून दोन्ही बाजूच्या रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. अतिशय वर्दळीचा हा रस्ता आहे. यामुळे वाहतूकीचा खूप मोठा खोळंबा झाला आहे. घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. एक दिवसांपूर्वीच या उड्डाणपुलावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ताफा या उड्डाणपुलावरून गेला होता. 

 

Read More