Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

महाविकास आघाडीची धागधुक वाढली, राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार लढवण्यावर भाजप ठाम

 Rajya Sabha elections: BJP is determined to contest for the third seat : राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार लढवण्यावर भाजप ठाम असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे तिसऱ्या उमेदवारीने धागधुकी वाढली आहे.

महाविकास आघाडीची धागधुक वाढली, राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार लढवण्यावर भाजप ठाम

मुंबई : Rajya Sabha elections: BJP is determined to contest for the third seat : राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार लढवण्यावर भाजप ठाम असल्याची माहिती पुढे आली आहे. तिसऱ्या उमेदवारासाठी मतांची जुळवाजुळव झाल्याचाही भाजपच्या सूत्रांचा दावा आहे. दरम्यान, राज्यसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र, तिसऱ्या उमेदवारीने धागधुकी वाढली आहे.

दुसरीकडे भाजपाने तिसरा उमेदवार मागे घ्यावा यासाठी महाविकास आघाडीने प्रस्ताव दिला आहे. भाजपाला विधान परिषद एक जागा जास्त द्यायचा विचार महाविकास आघाडी करणार करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  परंतु भाजपने माघार घेण्यास नकार दिल्याचे बोलले जात आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांनी आज भेट घेतली. यावेळी महाविकास आघाडीचे नेते विधान परिषद एक जाग जास्त देईल, असा प्रस्ताव फडणवीस बैछकीत ठेवल्याची माहिती आहे. भाजपाला विधान परिषदेची अधिकची जागा देऊन राज्यसभा बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, भाजप तिसऱ्या जागेवर ठाम असल्याने पुढे काय होणार, याची उत्सुकता लागली आहे.

Read More