Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

खंडणीसाठी रवी पुजारीचा डॉक्टरला फोन, तक्रार दाखल

पुजारीने आपला मोर्चा छोट्या व्यवसायिकांकडे वळवलाय

खंडणीसाठी रवी पुजारीचा डॉक्टरला फोन, तक्रार दाखल

मुंबई : मुंबईतील कुप्रसिद्ध खंडणीखोर रवी पुजारीनं आता खंडणीसाठी आता वैद्यकीय व्यावसायिकांकडे वळवलाय. मुंबईच्या चेंबूर परिसरातील एका डॉक्टरकडे रवी पुजारीच्या टोळीनं पाच कोटींची खंडणी मागितलीय. रवी पुजारीनं स्वतः पाच कोटींसाठी फोन केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात करण्यात आलीय.

याआधी अनेक सेलिब्रिटी आणि बांधकाम व्यावसायिकांना रवी पूजारीने धमकावलं आहे. मात्र त्यात फारसं यश येत नसल्याने आता पुजारीने आपला मोर्चा छोट्या व्यवसायिकांकडे वळवल्याच गुन्हे शाखेच्या सूत्रांचा दावा आहे.

याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून चेंबूर पोलीस आणि खंडणीविरोधीपथक तपास करत आहे.

Read More