RBI Job: जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी चांगल्या पद आणि पगाराची नोकरी मिळणार आहे. यात तुम्हाला 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त पगार मिळू शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नोकरीसाठी अर्ज मागवले असून रिक्त पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करु शकतात.
आरबीआयमध्ये संपर्क अधिकारी पद भरण्यात येणार आहे. या नोकरीमध्ये चांगल्या पगारासोबतच तुम्हाला लाईफस्टाइल आणि प्रवास (TA/HA) भत्ते, मोबाईल फोन सुविधा आणि सोडेक्सो जेवण कार्डचा लाभ देखील मिळेल.
RBI संपर्क अधिकारी भरतीअंतर्गत एकूण 4 रिक्त जागा भरल्या जातील. अनुभवी प्रोफेशनल्सची भरती करणे हे या भरती प्रक्रियेचे उद्दिष्ट आहे. जे मध्यवर्ती बँकेच्या उच्च नेतृत्व आणि विविध सरकारी आणि कायदा अंमलबजावणी संस्थांमध्ये महत्त्वाचे संपर्क दुवे म्हणून काम करू शकतात.
RBI संपर्क अधिकारी भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. नेपाळ, भूतानचे नागरिक, तिबेटी निर्वासित (जे 1 जानेवारी 1962 पूर्वी भारतात आले होते) आणि विशिष्ट देशांमधून स्थलांतरित झालेले भारतीय वंशाचे व्यक्ती देखील काही अटींच्या अधीन राहून पात्र आहेत. उमेदवारांचे वय 1 जुलै 2025 रोजी 50 ते 63 वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा महाविद्यालयातून पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे.
उमेदवाराला निवृत्तीच्या तारखेपूर्वीच्या 5 वर्षांत किमान 3 वर्षांसाठी मुंबईतील सार्वजनिक क्षेत्रातील बँक किंवा आरबीआयमध्ये संपर्क/प्रोटोकॉल कर्तव्ये हाताळण्याचा थेट कामाचा अनुभव असावा. सार्वजनिक क्षेत्रातील बँक किंवा आरबीआयमधून निवृत्त झालेले उमेदवारच या पदासाठी पात्र असतील. सार्वजनिक क्षेत्रातील बँक किंवा आरबीआयमधून निवृत्त झालेले उमेदवारच या पदासाठी पात्र असतील. उमेदवार त्यांच्या मागील संस्थेतून 'अनुदान/सेकंडमेंट' तत्त्वावर सामील होण्यास पात्र राहणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या.
RBI बँकेत नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांना त्यांच्या अर्जाची हार्ड कॉपी पोस्टाने, कुरिअरने किंवा हाताने RBI सेवा मंडळ, मुंबई येथे सादर करावी लागेल. याव्यतिरिक्त, त्याची सॉफ्ट कॉपी सर्व सहाय्यक कागदपत्रांसह documentrbisb@rbi.org.in या ईमेल पत्त्यावर पाठवावी. 14 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.