Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

आताची मोठी बातमी! मुंबई बँकेतील बोगस मजूर प्रकरण, प्रवीण दरेकर यांना मोठा दिलासा

चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या भाजप नेते प्रवीण दरेकर यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

आताची मोठी बातमी! मुंबई बँकेतील बोगस मजूर प्रकरण, प्रवीण दरेकर यांना मोठा दिलासा

मुंबई : मुंबई बँकेतील (Mumbai Bank) बोगस मजूर प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना मोठा दिलासा मिळाला आह. मुंबई उच्च न्यायालयाने प्रवीण दरेकर यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. 

याआधी सत्र न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिला होता, पण अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. याविरोधात दरेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका केली. आता उच्च न्यायालायने प्रवीण दरेकर यांना मोठा दिलासा दिला आहे. 

मुंबई बँकेतील बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकर यांची मुंबई पोलिसांकडून दोनवेळा चौकशी करण्यात आली होती. सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला होता. 

काय आहे नेमकं प्रकरण?
मुंबई बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर हे मजूर आणि नागरी सहकार अशआ दोन्ही प्रवर्गातून निवडून आले होते. पण प्रवीण दरेकर यांच्याविरोधात आपचे धनंजय शिंदे यांनी तक्रार नोंदवली होती. मजूर नसतानाही प्रवीण दरेकर यांनी निवडणूक लढवून बँकेचे हजारो ठेविदार आणि सरकारची फसवणूक केल्याचा आरोप धनंजय शिंदे यांनी केवा होता. यानंतर सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मंजूर म्हणून अपात्र ठरवलं होतं. 

Read More