Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

पुलवामा हल्ल्यानंतर सचिन तेंडुलकरकडूनचा संताप

जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे दहशतवादी हल्ला घडवून आणला. या हल्ल्याबाबत सचिन तेंडुलकर यांनी तीव्र शब्दात संपात व्यक्त केला आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर सचिन तेंडुलकरकडूनचा संताप

मुंबई : जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे दहशतवादी हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे ४० जवान शहीद झाले. हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानला चांगला धडा शिकविला पाहिजे, अशी मागणी करण्यात येत आहे. आता माजी क्रिकेटपट्टू भारत रत्न सचिन तेंडुलकर यांनी तीव्र शब्दात संपात व्यक्त केला आहे.

fallbacks

सचिन तेंडुलकर यांनी ट्विटर आणि फेसबूकवर एक संदेश पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा हल्ला भ्याड, धूर्त आणि अर्थहीन आहे. आपल्या प्रियजणांना ज्यांनी गमावले आहे त्यांच्यासाठी जीव तुटतो आहे. रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. तुमच्या सेवा आणि निष्ठेला माझा सलाम आहे, असे सोशल मीडियावर म्हटले आहे. तसेच माजी कर्णधार गौतम गंभीर, क्रिकेटपट्टू हार्दिक पंड्यानेही ट्विट केले आहे.

fallbacks

वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, मोहम्मद कैफ यांनीही तीव्र शब्दात आपला संपाप व्यक्त केला आहे.

Read More