Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

सचिन वाझेची आठवी कार NIA च्या ताब्यात; मनसुख हिरेन हत्येबाबत गुढ उकलनार

एनआयएकडून तपासात आता सचिन वाझेची आठवी कार देखील जप्त करण्यात आली आहे.

सचिन वाझेची आठवी कार NIA च्या ताब्यात; मनसुख हिरेन हत्येबाबत गुढ उकलनार

मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं सापडल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझेला NIA ने ताब्यात घेतले होते. याप्रकरणाचा कसून तपास सुरू असताना, सचिन वाझेच्या अलिशान कार जप्त करण्यात आल्या होत्या. तपासात आता वाझेची आठवी कार देखील जप्त करण्यात आली आहे.

अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्याच्या संशयावरून सचिन वाझेला एनआयएने ताब्यात घेतले होते. त्याआधी ठाण्यातील उद्योजक मनसुख हिरेन यांचीही हत्या झाली होती. हिरेन यांच्या हत्येतही वाझे यांचा हात असल्याची एनआयएला शंका आहे. 

त्यादिशेने सुरू असलेल्या तपासादरम्यान, वाझे यांच्याकडून अनेक गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत त्यांच्याकडून सात कार जप्त करण्यात आल्या होत्या. आता एनआयएने वाझेची आणखी एक पांढऱ्या रंगाची मर्सिडीज कार जप्त केली आहे.

ही कार वाझे स्वतः चालवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात या मर्सिडीजची भूमिका महत्वाची असल्याची माहिती मिळतेय.

 

एकूण आठ गाड्या --- 

स्कॉर्पियो - जिलेटीन काड्या ठेवलेली 

इनोव्हा - स्कॉर्पियो सोबत 

मर्सिडीज

लॅन्ड क्रूझर 

वोल्वो - सुरत हुन आणली 

औटलेंडर - वाशी येथून जप्त 

मर्सिडीज सफेद

 

Read More