Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईचे माजी नगरपाल नाना चुडासामांचे निधन

भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि प्रवक्त्या शायना एन.सी यांचे ते वडील होते. 

मुंबईचे माजी नगरपाल नाना चुडासामांचे निधन

मुंबई :  मुंबईचे माजी नगरपाल आणि ज्येष्ठ समाजसेवक नाना चुडासामा यांचं निधन झालंय. वयाच्या ८४व्या वर्षी त्यांनी मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात चुडासामा यांनी भरीव योगदान दिलंय. जायंट इंटरनॅशनल या सामाजिक संस्थेचे ते संस्थापक होते. मुंबई माझी लाडकी, फोरम अगेन्स्ट ड्रग्ज ॲण्ड एड्स, नॅशनल किडनी फाऊंडेशन, कॉमन मेन्स फोरम अशा विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य केलं. 

शायना एन.सींचे वडील

नाना चुडासामा यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत २००५ साली त्यांना पद्मश्री या पुरस्कारानेही गौरवण्यात आलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध घटनांवर ते अचूक शब्दांत भाष्य करायचे. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि प्रवक्त्या शायना एन.सी यांचे ते वडील होते. 

Read More