Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

आता हाऊसिंग सोसायटीची कटकट संपणार, गृहनिर्माण मंत्र्यांचा मोठा निर्णय

गृहनिर्माण मंत्री जिंतेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता या पुढे फ्लॅट विक्री करताना सोसायटीच्या परवानगीची गरज भासणार नाही. 

आता हाऊसिंग सोसायटीची कटकट संपणार, गृहनिर्माण मंत्र्यांचा मोठा निर्णय

मुंबई : गृहनिर्माण मंत्री जिंतेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता या पुढे फ्लॅट विक्री करताना सोसायटीच्या परवानगीची गरज भासणार नाहीये. आतापर्यंत फ्लॅटविक्री करताना फ्लॅट मालकाला आणि खरेदीदाराला सोसायटीला पूर्वकल्पना द्यावी लागायची. मात्र आता गृहनिर्माण मंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता फ्लॅट मालक आणि खरेदीदाराची या कटकटीतून सुटका होणार आहे. (sale of the house will no longer require the permission of the society big decision of housing minister jitendra awhad) 

आव्हाड काय म्हणाले? 

घरविक्रीसाठी यापुढे सोसायटीच्या परवानगीची गरज भासणार नाही.. फ्लॅट विक्रीचा आधिकार हा घर मालकाला आहे. घरमालक आणि खरेदीदार यांच्यात सौदा झाला असेल तर त्यासाठी सोसायटीच्या परवान्याची गरज नाही, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलीये. या घोषणेमुळे फ्लॅट विक्रीसाठी सोसायटीच्या परवानगीची प्रथा मोडित निघणार आहे.  मात्र त्यासाठी घरमालकानं त्याची थकबाकी नाही याचं एनओसी काढणं गरजेचं आहे असंही आव्हाड म्हणालेत. 

Read More