Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

समीर भुजबळांना २८ महिन्यानंतर जामीन मंजूर

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून जेलमध्ये असलेल्या समीर भूजबळ यांना आज अखेर जामीन मिळाला आहे.

समीर भुजबळांना २८ महिन्यानंतर जामीन मंजूर

मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून जेलमध्ये असलेल्या समीर भूजबळ यांना आज अखेर जामीन मिळाला आहे. यावेळी पीएमएलए कायद्यातील बदलाच्या धर्तीवर समीर भुजबळांना जामीन मंजूर करण्याची मागणी त्याच्या वकिलांनी केली. ती मागणी मंजूर करत मुंबई उच्च न्यायालयानं भुजबळांना जामीन दिला. याआधी ४ मे रोजी छगन भुजबळांना जामीन मंजूर झाला होता. पीएमएलए कायद्यामध्ये बदल झाल्यानंतर देशभरातील ५४ पैकी ५३ आरोपींना जामीन मिळाला होता. त्यामुळे समीर भुजबळांनाही जामीन देण्यात यावा अशी मागणी वकिलांनी कोर्टात केली होती. त्यानंतर कोर्टानं हा जामीन मंजूर केला. 

Read More