Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

Sanjay Raut Arrested : ईडीच्या ताब्यात असणाऱ्या संजय राऊत यांची संपत्ती आहेत तरी किती ?

त्यांच्या संपत्तीचा नेमका आकडा किती, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.   

Sanjay Raut Arrested  : ईडीच्या ताब्यात असणाऱ्या संजय राऊत यांची संपत्ती आहेत तरी किती ?

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करत रविवारी मध्यरात्री ईडीनं त्यांना अटक केली. रविवारी दुपारी अंमलबजावणी संचलनालयाकडून त्यांची चौकशी करण्यात आली. (Sanjay Raut Arrested  net worth wealth alibag mumbai flat plot bank account)

घरात 9 तास आणि ईडी कार्यालयात जवळपास सात तासांहून अधिक वेळासाठी चौकशी केल्यानंतर संजय राऊतांच्या अडचणी वाढताना दिसल्या. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी राऊतांवर ईडीनं कारवाईचा बडगा उगारला. ज्यानंतर आता त्यांच्या संपत्तीचा नेमका आकडा किती, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार बँकेत राऊतांच्या नावे बऱ्याच एफडी आहेत. शिवाय मुंबईसह अलिबागमध्येही त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावे भूखंड, फ्लॅट असल्याची नोंद आहे. राज्यसभेच्या नामनिर्देशनासाठीच्या अर्ज भरताना त्यांनी आपली संपत्ती जाहीर केली होती. 

नमूद केल्यानुसार राऊतांनी आपल्याकडे 1 लाख 55 हजार 772 रुपये रोकड असल्याचं सांगत बँकेत 1 कोटी 93 लाख 55 हजार 809 रुपये असल्याची माहिती दिली होती. याव्यतिरिक्त आपल्या नावे 2004 मध्ये खरेदी केलेल्या वाहनाची नोंद असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. 

पत्नीकडे किती सोनं- चांदी? 
पत्नी वर्षा राऊत यांच्याकडे 729.30 ग्रॅम सोनं असल्याचं राऊतांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलं होतं. दागिन्यांची एकूण किंमत 39 लाख 59 हजार 500 रुपये असल्याची माहिती समोर येत आहे. राऊतांच्या पत्नीकडे 1820 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आहेत. या दागिन्यांची किंमत 30 हजार रुपयांच्या घरात असल्याचं सांगण्यात येत आहे. 

राऊतांच्या नावे बँकेत 3 कोटी 38 लाख 77 हजार 666 रुपयांच्या एफडी आहेत. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार राऊतांनी 2020-21 या आर्थिक वर्षात 27 लाख 99 हजार 169 रुपयांची कमाई केली होती. तर त्यांच्या पत्नीच्या कमाईचा आकडा 21 लाख 58 हजार 790 इतका दाखवण्यात आला होता. 

किती प्लॉट आणि फ्लॅट? 
अलिबाग आणि पालघर, दादर अशा भागांत राऊत आणि त्यांच्या पत्नीच्या नावे फ्लॅट आणि प्लॉट असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, एकिकडे राऊतांच्या संपत्तीची चर्चा असतानाच दुसरीकडे ईडीनं त्यांच्या 11 लाखांपेक्षा अधिकच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई केली आहे. 

Read More