मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला आणि तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भेटी व्हायच्या, असं वादग्रस्त वक्तव्य संजय राऊत यांनी काल केलं होतं. या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर आता संजय राऊत यांनी हे वक्तव्य मागे घेतलं आहे. काँग्रेसमधल्या आमच्या मित्रांनी दुखावलं जाण्याची गरज नाही. या वक्तव्यामुळे इंदिरा गांधींची प्रतिमा मलिन झाली असं त्यांना वाटत असेल, तसंच कुणी दुखावलं गेलं असेल तर मी माझं वक्तव्य मागे घेत आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
BREAKING NEWS
— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 16, 2020
मुंबई : 'इंदिरा गांधी - करीम लाला यांच्या भेटी'बाबतचं वक्तव्य संजय राऊत यांच्याकडून मागे... कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्या तर वक्तव्य मागे घेतो #संजयराऊत#SanjayRaut #Shivsena #Congress https://t.co/HOK58cBO5u pic.twitter.com/0YNQRGnuBs
Sanjay Raut, Shiv Sena on his statement 'Indira Gandhi used to go & meet Karim Lala (underworld don)': Our friends from Congress need not feel hurt. If someone feels that my statement has hurt the image of Indira Gandhi ji or hurt someone's feelings, I take back my statement. pic.twitter.com/7fV6Y4KyhU
— ANI (@ANI) January 16, 2020
वक्तव्य मागे घेण्याआधी संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन या मुद्द्यावरुन सारवासारव केली होती. एकेकाळचा अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला हा पठाणांच्या संघटनेचा अध्यक्ष होता. त्या निमित्तानं तो इंदिरा गांधींना पंतप्रधान या नात्यानं भेटत असे, असं संजय राऊत म्हणाले.
काँग्रेस नेत्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध होते का? असा सवाल उपस्थित करत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. सत्तेसाठी लालची असल्यामुळेच काँग्रेस या आरोपाचं खंडन करत नसल्याचा टोला फडणवीसांनी लगावला.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर कॉंग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतलीयं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींबाबत केलेले वक्तव्य त्वरित मागे घ्यावेत असं मिलिंद देवरा म्हणालेत. तर संजय निरुपम यांनीही राऊतांवर टीकास्त्र सोडंलय. इंदिरा गांधींविरोधात अविचारी बोलाल तर पश्चाताप कराल अशा शब्दांत निरुपम यांनी संजय राऊतांना सुनावलं.
बेहतर होगा कि शिवसेना के मि.शायर दूसरों की हल्की-फुल्की शायरी सुनाकर महाराष्ट्र का मनोरंजन करते रहें।
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) January 16, 2020
पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी जी के खिलाफ दुष्प्रचार करेंगे तो उन्हें पछताना पड़ेगा।
कल उन्होंने इदिराजी के बारे में जो बयान दिया है वो वापस ले लें।
शिवसेनेचे मिस्टर शायर असणाऱ्यांनी हलक्या फुलक्या शायरी करुन महाराष्ट्राचं मनोरंजन करण्यातच हित आहे. इंदिरा गांधींबाबत दुष्प्रचार कराल तर पस्तावाल. काल त्यांनी जे विधान केलं ते मागे घ्यावं, असं संजय निरुपम म्हणाले आहेत.
Indira ji was a true patriot who never compromised on India’s national security.
— Milind Deora मिलिंद देवरा (@milinddeora) January 16, 2020
As former @INCMumbai President, I demand that @rautsanjay61 ji withdraws his ill-informed statement.
Political leaders must show restraint before distorting the legacies of deceased Prime Ministers
तर मिलिंद देवरा यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. इंदिरा गांधी या खऱ्या देशभक्त होत्या. त्यांनी देशाच्या सुरक्षेबाबत कधीच तडजोड केली नाही. संजय राऊत यांनी चुकीची माहिती असलेलं त्यांचं वक्तव्य मागे घ्यावं, अशी मागणी मी मुंबई काँग्रेसचा माजी अध्यक्ष या नात्याने करतो. दिवंगत पंतप्रधानांबाबत अशी वक्तव्य करताना संयम बाळगला पाहिजे, असं मिलिंद देवरा म्हणाले.