Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, राऊतांच्या पार्टनरच्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल

कोविड सेंटरमध्ये 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, राऊतांच्या पार्टनरच्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : पत्राचाळ घोटाळाप्रकरणी (Patrachawl Scam) न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) असलेल्या संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचमीत आणखी वाढ झाली आहे. संजय राऊत यांचा पार्टनर सुजित पाटकरच्या (Sujit Patkar) लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट (Lifeline Hospital) कंपनीविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. खोटी कागदपत्रं दाखवून, फसवणूक करून मुंबईतील वरळी, दहिसर, महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड, पुण्याच्या जंबो कोविड सेंटरचं (Jumbo Covid Centre) कॉन्ट्रॅक्ट मिळवल्याचा ठपका सुजित पाटकरच्या कंपनीवर आहे. 

त्यांच्या अक्षमतेमुळे अनेक कोविड रूग्णांचा मृत्यू झाला असा आरोप करण्यात आला आहे. आता संजय राऊत आणि त्यांचे पार्टनर सुजित पाटकर यांना कोविड सेंटर घोटाळ्याचा सुद्धा हिशोब द्यावा लागणार आहे. 

किरीट सोमय्या यांनी केला होता आरोप
कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा घोटाळा केल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे भागिदार असलेली लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस ही कंपनी अस्तित्वाच नाही, असं असतानाही या कंपनीला कोविड सेंटरचं कंत्राट देण्यात आलं. या कंपनीने कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. 

या घोटाळ्याची चौकशी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ऑथोरिटीने करावी अशी मागणीही किरीट सोमय्या यांनी केली होती.

Read More