Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

संजय राऊत, उद्धव ठाकरे घाबरतात- किरीट सोमय्या

 लंडनमध्ये प्रॉपर्टी कशी केली याचं उत्तर सरनाईकांना द्यावं लागेल अशी टीका किरीट सोमय्यांनी केलीय. 

संजय राऊत, उद्धव ठाकरे घाबरतात- किरीट सोमय्या

मुंबई : मुलांना ईडीत बसवलं पण स्वतः पळून गेले. सरकारचा पैसा डायव्हर्ट होऊन लंडनमध्ये प्रॉपर्टी कशी केली याचं उत्तर सरनाईकांना द्यावं लागेल अशी टीका किरीट सोमय्यांनी केलीय. संजय राऊत, उद्धव ठाकरे घाबरतात असा टोला त्यांनी मारला. कालपासून सरकारचं कव्हरअप ऑपरेशन सुरू आहे. राजकीय दबाव पवारांनी शिकवू नये अशी टीका सोमय्यांनी केली. 

आमदार प्रताप सरनाईक हे क्वारंटाईन झाले आहेत. बाहेर गावाहून आल्यामुळे सरनाईक क्वारंटाईन झालेत. विहंग सरनाईक यांच्या पत्नी आजारी असल्याची माहिती आहे. त्यांना ज्युपिटर रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. यामुळे पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलावण्याची विनंती प्रताप सरनाईक यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना केली आहे. 

आज प्रताप सरनाईक यांचे मेहुणे विनंती पत्र घेऊन ईडीच्या कार्यालयात येणार आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांना सरनाईक कुटुंब संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं.  सरनाईक यांच्या भागिदाराची माहिती देण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलं. 

Read More