Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

राणे, बकाल आणि बकवास बोलू नका; अंगावर याल तर ही शिवसेना आहे - संजय राऊत

Sanjay Raut PC : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना शिवसेनेकडून पुन्हा इशारा देण्यात आला आहे.  

राणे, बकाल आणि बकवास बोलू नका; अंगावर याल तर ही शिवसेना आहे - संजय राऊत

मुंबई : Sanjay Raut PC : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना शिवसेनेकडून पुन्हा इशारा देण्यात आला आहे. तुम्ही केंद्रातील मंत्री आहात. आधी देश समजून घ्या. जे काम आहे ते करा. राज्यात येवून बकाल आणि बकवास बोलू नका. त्यांनी आपल्या मर्यादेत राहावे. अंगावर याल तर ही शिवसेना आहे, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राणे यांना इशारा दिला आहे.

केंद्रीय मंत्रीपदावर राहून बकाल बडबड कराल तर महाराष्ट्रातून नामशेष व्हाल, असाही इशारा खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांना दिला. राज्यात देवेंद्र फडणवीस यांना धमकीचं पत्र काही वर्षांपूर्वी आलं होते, ते लोक अजूनही तुरूंगात आहेत, असे राऊत म्हणाले. रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या फोन क्लिपबाबत त्यांनी परब यांच्या कृतीचे समर्थन केले आहे.

राणे यांनी जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. त्याला कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. त्यांनी लोकांचा आशीर्वाद घ्यावा आणि पुढे जावे. पण प्रत्येक ठिकाणी ते शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Maharashtra CM Uddhav Thackeray ) यांच्याबद्दल अपशब्द काढत आहेत. वाटेल ते बोलत आहे. तुमची बकवासबाजी बंद करा. तुम्ही वाटेल ते बोलाल आणि आम्ही ते ऐकून घेणार नाही. ते आमच्या विरोधात बोलू शकतात. लोकशाही आहे. मात्र, भाषेचा वापर त्यांनी योग्य करायला हवा, असे राऊत म्हणाले.

राणे म्हणजे बाळासाहेब ठाकरे नाहीत. त्यांनी मर्यादेत राहावे. त्यांचे काम काय आहे, ते त्यांनी पाहावे. ते सुक्ष्म व लघु उद्योग मंत्री आहात. त्याचा निट अभ्यास करा. आपल्या खात्याबद्दल जनतेसमोर मांडावे. मात्र, शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वाटेल ते बोलले खपवून घेतले जाणार नाही. शिवसेना सरकारमध्ये असो किंवा विरोधी पक्षात ती शिवसेनाच राहील. जर तुम्ही मर्यादा ओलांडली तर आम्हीही तेच करू, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

Read More