Aatish Kapadia: भारताची आर्थिक राजधानी मुंबई जगातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक आहे. मर्यादित भूभाग, वाढती लोकसंख्या आणि मोठ्या कंपन्यांचे केंद्र असल्याने घरांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. 2025 च्या पहिल्या सहामाहीत मुंबई देशातील सर्वात महागडे गृहनिर्माण बाजारपेठ ठरली, जिथे 1 कोटींहून अधिक किमतीच्या घरांची विक्री 36% होती. मालाबार हिल, जुहू, वरळी, वांद्रे यांसारख्या उच्चभ्रू भागात किमती कोट्यवधींमध्ये आहेत. वरळीतील 'नमन जाना' प्रकल्पातील डुप्लेक्स फ्लॅट 703 कोटींना विकले गेले. मागणी, आलिशान सुविधा आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे किमतीत 8-14% वार्षिक वाढ नोंदवली गेली. परवडणारी घरे कमी होत असून सामान्य माणसासाठी घर घेणे कठीण झाले आहे. दरम्यान मालाबार हिल, जुहू, वरळी, वांद्र याव्यतिरिक्त आणखी एक विभागाची चर्चा आहे, जिथे 1 हजार कोटी रुपयांना घराची खरेदी झालीय. कोणी घेतलंय हे घर? काय मिळताय यात सुविधा? सर्वकाही जाणून घेऊया.
एका प्रसिद्ध मालिकेच्या दिग्दर्शकाने मुंबईतील गोरेगाव परिसरात 15.31 कोटी रुपयांना एक अपार्टमेंट खरेदी केले आहे. रिअल इस्टेट मार्केटप्लेस स्क्वेअरयार्ड्सने नोंदणी महानिरीक्षक (आयजीआर) च्या वेबसाइटवर नोंदणीकृत मालमत्ता नोंदणी कागदपत्रांच्या आधारे ही माहिती समोर आली आहे. हा करार जून 2025 मध्ये नोंदणीकृत झाला होता.
खरेदी केलेल्या या जागेत 3030.07 चौरस फूट कार्पेट एरिया, तीन पार्किंग स्पेस समाविष्ट आहेत. स्क्वेअरयार्ड्सने रिव्ह्यू केलेल्या आयजीआर कागदपत्रांनुसार, हे अपार्टमेंट ओबेरॉय रिअल्टीच्या प्रकल्प एलिसियनमध्ये आहे. त्याचा रेरा कार्पेट एरिया 281.50 चौरस मीटर (सुमारे 3030.07 चौरस फूट) आहे. या करारात तीन कार पार्किंग स्पेस देखील समाविष्ट आहेत.
या मालमत्तेच्या नोंदणीवर 91.86 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 300000 रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आले आहे. स्क्वेअर यार्ड्स डेटा इंटेलिजेंसनुसार एप्रिल 2024 ते मार्च 2025 दरम्यान ओबेरॉय रिअल्टीच्या एलिसियन प्रकल्पात एकूण 116 विक्री नोंदणी झाल्या आहेत, ज्यांचे एकूण व्यवहार मूल्य 1035 कोटी रुपये आहे. या प्रकल्पातील मालमत्तेची सरासरी किंमत 50869 रुपये प्रति चौरस फूट आहे.
मुंबईचा गोरेगाव परिसर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, एसव्ही रोड आणि गोरेगाव रेल्वे स्टेशनद्वारे जोडलेला आहे. ज्यामुळे इथून अंधेरी, मालाड आणि बीकेसी सारख्या प्रमुख व्यावसायिक जिल्ह्यांत सहज पोहोचता येते. कॉर्पोरेट ऑफिसेस, फिल्म स्टुडिओ आणि प्रोडक्शन हाऊसेस या सर्व गोष्टींमुळे हे क्षेत्र व्यावसायिक आणि क्रिएटीव्ह लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. या कारणास्तव याला दुसरे वांद्रे असेही म्हटले जाते. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसारख्या पायाभूत सुविधांच्या सुधारणांमुळे आणि इनॉर्बिट मॉल आणि इन्फिनिटी मॉलसारख्या प्रमुख रिटेल हबच्या जवळ असल्याने गोरेगाव पश्चिम हे सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि सर्वोत्तम दर्जाचे राहणीमान देणारे गतिमान शहरी केंद्र म्हणून वेगाने उदयास येत आहे.
खिचडी, साराभाई व्हर्सेस साराभाई सारख्या टीव्ही मालिकांचे दिग्दर्शक, अभिनेता आणि पटकथा लेखक आतीश कपाडिया यांनी त्यांच्या पत्नी अॅलिसन कपाडिया यांच्यासह ही मालमत्ता खरेदी केली आहे.
आतिश कपाडिया हा एक भारतीय अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहेत. जे प्रामुख्याने हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी ओळखले जातात. वागले की दुनिया (2021-2025), हॅपी फॅमिली कंडिशन अप्लाय (2023), खिचडी (2002-2018) आणि पुष्पा इम्पॉसिबल (2022-2025) सारखे लोकप्रिय टीव्ही शो लिहिण्यासाठी आणि निर्मिती करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी हॅट्स ऑफ प्रॉडक्शन्सची सह-स्थापना केली. ज्याने खिचडी, बा बहू और बेबी आणि वागले की दुनिया सारख्या अनेक हिट टीव्ही मालिकांची निर्मिती केली आहे.