Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मुंबईकरांना मिळणार दुसरे मरीन ड्राइव्ह! कुठे आहे लोकेशन अन् कसा असेल हा मार्ग, सगळ जाणून घ्या

Mumbai Second Marine Drive: मुंबईकरांना आता लवकरच दुसरे मरीन ड्राइव्ह मिळणार आहे. या मार्गाचे काम वेगाने सुरू आहेत.

मुंबईकरांना मिळणार दुसरे मरीन ड्राइव्ह! कुठे आहे लोकेशन अन् कसा असेल हा मार्ग, सगळ जाणून घ्या

Mumbai Second Marine Drive: मुंबईकरांना आता लवकरच दुसरे मरीन ड्राइव्ह मिळणार आहे. मरीन ड्राइव्ह म्हणजे मुंबईकरांची हक्काची जागा. समुद्राची गाज ऐकत शांतपणे मरीनच्या कट्ट्यावर बसणे नाहीतर एखाद्या जवळच्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मरीन ड्राइव्ह हे ठरलेले ठिकाण. समुद्र, गार हवा आणि हवीहवीशी सोबत हे म्हणजे ठरलेले समीकरण. पण आता मुंबईकरांना आणखी एक मरीन ड्राइव्ह मिळणार आहे.

 मुंबई कोस्टल रोडवरील बहुप्रतिक्षीत समुद्राभिमुख मार्गाचे काम गेल्याच आठवड्यात पूर्ण झाले आहे.  7.47 किमी लांबी आणि 20 मीटर रुंदीचा हा भव्य मार्ग प्रियदर्शनी पार्क ते वांद्रे-वरळी सी लिंकच्या वरळीच्या टोकापर्यंत असलेल्या कोस्टल रोडला जोडतो. हा मार्ग मरीन ड्राइव्हच्या लांबीच्या दुप्पट आहे. सध्या संपूर्ण रस्त्याच्या तुलनेत 5.25 किमीचा रस्ता नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून अंतिम मंजुरीची अद्याप प्रतीक्षा आहे.

कसा असेल मार्ग?

 ब्रीच कँडीयेथील प्रियदर्शनी पार्क ते वांद्रे वरळी सागरी सेतूचे वरळी टोक या 7.5 किमी मार्गावर हे नवीन मरीन ड्राइव्ह असेल. दर 400 मीटरवर एक अशाप्रकारे 200 भुयारी मार्गिका यात असणार आहे. या मार्गिकेतून समुद्राच्या दिशेला आणि त्याच्या विरुद्ध बाजूला जाता येणार आहे. 12 हेक्टरचा हा परिसर पालिकेने विकसित केला आहे. सागरी किनारा मार्गालगत 70 हेक्टर मोकळी जागा निर्माण करण्याच्या प्रकल्पाचा भाग म्हणून प्रकल्प राबवण्यात येत आहे.

 दुसऱ्या मरीन ड्राइव्हचे वैशिष्ट्यै

 - दुसऱ्या मरीन ड्राइव्ह मार्गिकेत 70 टक्के हिरवळ निर्माण करण्यात येणार आहे.

 - 30 टक्के भागात पायवाट, जॉगिंग ट्रॅक, सायकल मार्गिका असणार आहे.

 - पर्यटकांना बसण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण जागा करण्यात येणार

 कोस्टल रोडवरील दोन प्रमुख मार्गांचे काम टाटा-गार्डन ते हाजी अलीपर्यंतचा 2.75 किमीचा भाग आणि लव्हग्रोव्ह नाला आणि बी.एम.ठाकरे चौक दरम्यानचा 2.5 किमीचा भाग जुलैच्या मध्यापर्यंतच पूर्ण झाला होता.

Read More