नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 20 मधील एका निवासी सोसायटीमध्ये ही दुर्घटना घडलीये. भितीजवळील उभ्या असलेल्या बाईकही या खड्डयात पडल्या.. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमे-यात चित्रित झालीये. सोसायटीच्या शेजारी बांधकाम सुरू होते. या बांधकामामुळे जमीन खचली आणि सुरक्षा भिंत कोसळली. घटनेच्या वेळी जवळपास कोणीही उपस्थित नव्हते त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक रहिवाशांनी बांधकाम व्यावसायिकावर निष्काळजीपणाचा आरोप करत असून प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.