Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

ज्येष्ठ अभिनेते डॉ. हेमू अधिकारी यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते डॉ. हेमू अधिकारी यांचं निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते डॉ. हेमू अधिकारी यांचं निधन झालंय. दादरमध्ये वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. डॉ. हेमू अधिकारी हे रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन या क्षेत्रांतील एक लक्षणीय नाव आहे.

व्यवसायाने शास्त्रज्ञ असलेले, लोकविज्ञान चळवळीत, अण्वस्र विरोधी शांतता चळवळीत काम करणारे अधिकारी त्यांच्या अभिनेते या ओळखीबरोबरच आपल्या विवेकशील वैज्ञानिक दृष्टिकोनासाठीही ओळखले जायचे. 

४५ नाटकं, १६ चित्रपट आणि ७ मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. हेमू अधिकारी यांचे ‘नाट्य विज्ञान समाजेन’ हे पुस्तक गेल्यावर्षी सृजन प्रकाशनाने प्रकाशित केलंय.

Read More