Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

Nawab Malik : नवाब मलिक यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा

राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली असून गेले चार महिने ते तुरुंगात आहेत. 

Nawab Malik : नवाब मलिक यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik )  यांना सत्र न्यायालयाकडून एक दिलासा मिळाला आहे. मलिक गेले चार महिने तुरुंगात आहेत. मलिक यांना घरचे जेवण आणि खाजगी रुग्णालयात उपचार करून घेण्यास न्यायालयाने नकार दिला होता.

मलिक यांची प्रकृती वारंवार बिघडत आहे. त्यामुळे त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्यात यावी असा अर्ज न्यायालयात करण्यात आला होता. या अर्जावर न्यायालयाने निकाल दिला आहे.

मुंबई सत्र न्यायालयाने नवाब मलिक यांना खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी परवानगी दिली आहे. मुंबईतील कुर्ल्याच्या criticare रुग्णालयात मलिक यांना आता उपचार घेता येतील असे सत्र न्यायालयाने म्हटले आहे. 

कुर्ल्याच्या criticare रुग्णालयात मलिक यांना उपचार घेताना परिवारातील एका व्यक्तीला त्यांच्यासोबत उपचारादरम्यान उपस्थित राहण्याचीही कोर्टाने परवानगी दिली आहे. 

Read More