Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मतदान करून परतताना ९५ जणांचा तराफा उलटला...आणि

दुर्घटनेत ९५ जणं थोडक्यात बचावले आहेत.

मतदान करून परतताना ९५ जणांचा तराफा उलटला...आणि

ठाणे : तराफाच्या सहाय्यानं धरणाचं पात्र पार करताना९५ जणं थोडक्यात बचावले आहेत. शहापूर तालुक्यातील तानसा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये ही दुर्घटना घडली. बचावलेले सर्व नागरीक हे बोराळा गावातील रहिवासी आहेत. मतदानासाठी हे सर्वजण तराफाच्या सहाय्यानं तानसा मतदान केंद्राकडे आले, त्यानंतर मतदान करुन ते तराफ्याने घरी परतत होते. तराफा एकाबाजूला कलंडला आणि सर्वजण पाण्यात पडले.

तराफा पाण्यात उलटला त्यावर असलेल्या पुरुषांनी महिलांसह, इतरांचे जीव वाचविल्याचं घटनेच्या व्हिडिओमधून दिसतं आहे. बोराळा गावात जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. 

त्यामुळे या गावातील लोकं तानसा धरणाच्या जलाशयातून तराफ्याच्या सहाय्यानं वाहतुक करतात. मात्र मतदानाच्य दिवशी घडलेल्या या घटनेमुळे या गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Read More