Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

सत्तेचा दर्प नको...पवारांची फटकेबाजी...सर्वांनी पाहायला हवी अशी मुलाखत 'झी २४ तास'वर

सत्तेचा दर्प चालत नाही, असा टोला विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. सामना या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी हा टोला लगावला, ही मुलाखत

सत्तेचा दर्प नको...पवारांची फटकेबाजी...सर्वांनी पाहायला हवी अशी मुलाखत 'झी २४ तास'वर

मुंबई : सत्तेचा दर्प चालत नाही, असा टोला विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. सामना या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी हा टोला लगावला, ही मुलाखत सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली. तसेच विधानसभेला भाजपाचे उमेदवार निवडून आणण्यात शिवसेनेचा सिंहाचा वाटा असल्याचा टोला हाणायलाही शरद पवार यावेळी विसरले नाहीत. ही मुलाखत 'झी २४ तास'वर शनिवारी सकाळी ९ ला प्रसारीत होणार आहे.

या मुलाखतीत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना उत्तरं दिलेली आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेत कधीच नव्हते, त्यामुळे त्यांना काहीच माहित नाही असं देखील स्पष्ट केलं आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीत नेमका काय फरक आहे, हे सांगत असताना, शरद पवारांनी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम करत असल्याचा दाखला द्यायला विसरलेले नाहीत.

ही मुलाखत अडीच तासांची असल्याचं शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनाने म्हटलं आहे. कोरोना संकटातून महाराष्ट्र बाहेर पडेल आणि झेप घेईल असा विश्वास देखील शरद पवारांनी मुलाखतीत व्यक्त केला आहे.

Read More