Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

'कार्यकर्ते जेलमध्ये जाणार, अमित ठाकरे लपून बसणार' दीपाली सय्यद यांनी मनसेला डिवचलं

'अयोध्या दौरा रद्द करत असाल तर आदित्य ठाकरेंचा हात पकडून जा'

'कार्यकर्ते जेलमध्ये जाणार, अमित ठाकरे लपून बसणार' दीपाली सय्यद यांनी मनसेला डिवचलं

मुंबई : शिवसेनेने (ShivSena) झोप उडवली म्हणून राज ठाकरे (Raj Thackeray) यांना सकाळीच सभा घ्यावी लागली. आज घाबरलेला भोंगा संपूर्ण महाराष्ट्राने बघितला, अशी बोचरी टीका अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी केली आहे. कार्यकर्त्यांवर केसेस होतील आणि अमित ठाकरे (Amit Thackeray) कुठेतरी लपून बसतील असा टोलाही दीपाली सय्यद यांनी लगावला आहे. 

दीपाली सय्यद यांनी मनसे  (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेवर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्रातील जनतेला मनसे कार्यकर्त्यांना एक पत्र देणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले होते, यावरुन दीपाली सय्यद यांनी टीका केली आहे. 

काय म्हणाला दीपाली सय्यद? 
दीपाली सय्यद यांनी एक ट्विट केलं आहे. 'पत्रक घरोघरी दिल्यानंतर तुम्ही आंदोलन करून जेलमध्ये जाणार आणि अमित ठाकरे लपून बसणार हा शिलेदारांसाठी मोठा ट्रॅप आहे. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला, असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

दीपाली सय्यद विरुद्ध मनसे
दीपाली सय्यद यांनी गेल्या काही दिवसांपासून मनसेविरुद्ध जोरदार मोर्चा उघडला आहे. 'सभा रद्द करून कोणताच मुद्दा शेवट पर्यंत मार्गी न लावण्याची परंपरा राज साहेबांनी कायम ठेवली त्याबद्दल खंत आहे. पण पुण्याच्या मेळाव्याला वसंत मोरे यांना खुर्ची मिळेल का हा यांच्या पक्षाचा सर्वात मोठा प्रश्न आहे. अरे खुर्ची द्याल कि नाही!', अशा शब्दात दीपाली सय्यद यांनी काल मनसेवर टीका केली होती.

Read More