Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

उपआयुक्त शिवदीप लांडेंचा बारवर छापा, १२ बारबालांची सुटका

उपआयुक्त शिवदीप लांडे यांचा बारवर कारवाईचा सपाटा

उपआयुक्त शिवदीप लांडेंचा बारवर छापा, १२ बारबालांची सुटका

मुंबई : शनिवारी रात्री ग्रॅंटरोड येथील कल्पना बारवर पोलिसांनी छापा टाकला. मुंबई पोलिसांच्या समाज सेवा शाखेने केलेल्या या रेडमध्ये १२ बारबालांची सुटका करण्यात आली. यावेळी २ बारबाला बारमधील केवेटीमध्ये लपलेल्या होत्या. या बारच्या स्वच्छता गृहात ही लपण्यासाठी कॅव्हेटी बनवण्यात आली होती. कारवाईदरम्यान १२ बारबालांची सुटका करण्यात आली तर १८ कस्टमर्ससह बारमध्ये काम करणाऱ्या ९ वेटर्स, कॅशियर आणि मॅनेजरला पोलिसांनी अटक केली. ८४ हजार रूपयांची रोकड देखील यावेळी पोलिसांनी जप्त केली आहे. सध्या समाजसेवा शाखेचा चार्ज हा अमली पदार्थ विरोधी कक्षाचे उपआयुक्त शिवदीप लांडे यांच्याकडे असून त्यांनी सध्या बारवर कारवाईचा सपाटा लावला आहे.

Read More