Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

मातोश्रीवर शिवसेनेच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

 मातोश्रीवर महत्वपुर्ण बैठक पार पडली. 

मातोश्रीवर शिवसेनेच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

मुंबई : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सूरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहीले आहेत. यंदाच अधिवेशन हे नागपूरला घेण्यात येणार आहे. ४ जुलै पासून सूरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाला सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज झाले आहेत. शिवसेनेने देखील आपली रणनीती आखलीये. मातोश्रीवर महत्वपुर्ण बैठक पार पडली. या बैठकीला परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांच्यासह काही आमदार उपस्थित होते. बैठकी दरम्यान  महाराष्ट्रातील प्रश्नांवर चर्चा झाली. नाणार प्रकल्पावरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.

नाणार प्रश्न 

नाणार बाबत आमची भुमीका कायम रहाणार असून सभागृहात देखील शिवसेना आपली भूमीका मांडणार असल्याची माहिती शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी दिली.

Read More