Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

2019 निवडणुकीआधी शिवसेनेचं 'रामस्मरण'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिवचण्याचा प्रयत्न...?

2019 निवडणुकीआधी शिवसेनेचं 'रामस्मरण'

मुंबई : मला वाराणसीला जाऊन गंगापूजन करायचे आहे आणि अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घ्यायचे आहे. ह्या शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या घोषणेचे शिवसेनेत पडसाद उमटले आहेत. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी 'चलो अयोध्या... चलो वारणसी'चे आवाहन करणारी पोस्टर 'मातोश्री' आणि शिवसेनाभवन परिसरात लावली आहेत. नार्वेकर यांचे हे शिवसेनेच्या राजकारणातले पहिलं राजकीय पाऊल आणि शक्तीप्रदर्शन मानलं जात आहे. हे शक्तीप्रदर्शन शिवसेना आणि अन्य राजकीय पक्षांतही चर्चेचा विषय बनलं आहे. 

वाराणसी लोकसभा मतदार संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिवचण्याचाही यामाध्यमातून प्रयत्न करण्यात आल्याची कुजबूज यानिमित्तानं होते आहे.

पाहा बातमीचा व्हिडिओ

Read More