Marathi News> मुंबई बातम्या
Advertisement

'वंदे मातरम'वर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांवर सामनातून टीका

सामनामधून जोरदार टीकास्त्र 

'वंदे मातरम'वर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांवर सामनातून टीका

मुंबई : 'वंदे मातरम्' विषयी प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. प्रकाश आंबेडकरांचं राजकारण जीना छाप असून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अजिबात आवडलं नसतं असं सामनाच्या अग्रलेखात छापण्यात आलं आहे.

जन गण मन हे राष्ट्रगीत असतांना वंदे मातरमची गरज काय असा सवाल करत वंदे मातरमला विरोध असल्याचं वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. जर वंदे मातरम न म्हणणारे देशविरोधी असतील तर वंदे मातरम म्हणणारेही देशविरोधी असल्याचा आपला आरोप आहे, असे ते म्हणाले. 

ओवेसी वंदे मातरमला विरोध करतात, मग तुम्ही त्यांच्यासोबत कसे असा सवाल परभणीतल्या पत्रकारांनी केला असता त्यांनी हे विधान केलं. लाल सेना संघटनेतर्फे आयोजित मातंग सत्ता संपादन परिषदेसाठी ते परभणीत आले होते.

Read More