language raw in mumbai local: राज्यात सध्या मराठी आणि हिंदी भाषावादावरुन वातावरण तापले आहे. मराठी भाषामुद्द्यावरुन राजकारणदेखील तापलं आहे. आता हाच वाद मुंबई लोकलमध्येही दिसून आला आहे. लोकलमध्ये कधी कोणत्या मुद्दयावरुन वाद होईल हे काही सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वी दोन महिलांमध्ये रक्तबंबाळ होईपर्यंत भांडणं झाली होती. तर, आता लोकलमध्ये सीटवरुन वाद झाल्याचे पाहायला मिळतंय. लोकल सीटवरुन झालेला वाद थेट मराठी भाषेपर्यंत पोहोचला आहे. महिलांच्या डब्यात झालेल्या भांडणांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत, मुंबई लोकलच्या महिलांच्या डब्यात वादावादी सुरू झाली. यात एक महिला प्रवासी दुसऱ्या महिला प्रवाशाला हा आमचा महाराष्ट्र आहे, मराठी येत नसेल तर बाहेर निघ, असे बोलताना दिसत आहे. मात्र हा वाद नेमका कशामुळं सुरू झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, जागेवरुन दोन महिलांमध्ये वाद झाला मात्र पुढे तो वाद इतका ताणला की डब्यातील इतर महिलांनाही मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर थेट भाषेपर्यंत हा वाद पोहोचला. वाद इतका वाढला की लोकलमध्ये महिलांचे दोन गट तयार झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
काही जणांच्या मते, ही घटना मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये घडली आहे. मात्र अद्याप याबाबत काहीच ठोस माहिती समोर आलेली नाही. महिला डब्यांत जागेवरुन हा वाद सुरू झाला होता. यात काही महिला बोलताना दिसत आहेत की, आमच्या महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठीत बोल नाहीतर चालू पडा. त्यानंतर महिला डब्यातील प्रवाशांमध्ये दोन गट पडल्याचे दिसत आहेत.
#Mumbai में मराठी vs हिंदी का लेकर अब लोकल ट्रेन में पंहुचा..ट्रेन के ladies बोगी में शुक्रवार शाम महिलाओं में मराठी बोलने को लेकर हुआ विवाद..वायरल वीडियों आया सामने..सीट पर बैठने को लेकर हुआ विवाद.."हमारे मुम्बई में रहना है तो मराठी बोलो नही तो निकलो बाहर" #Marathi@TNNavbharat pic.twitter.com/9ePQHruJ6I
— Atul singh (@atuljmd123) July 20, 2025
दरम्यान, काही दिवसांपूर्वीदेखील असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत दोन महिलांमध्ये जबर मारामारी झाली. हे भांडण इतकं विकोपाला गेले की यातील एका महिलेच्या डोक्यातूनच रक्त येऊ लागले. अचानक जखमी झालेल्या महिलेने तिथेच उभ्या असलेल्या महिलेचे केस ओढून तिला मारायला सुरुवात केली. लोकलच्या दरवाजातच महिलांची हाणामारी सुरू झाल्याने दरवाजात उभ्या असलेल्या महिलादेखील घाबरल्या. दरवाजातून कोणी पडू नये म्हणून तिथे उभ्या असलेल्या एका महिलेने प्रसंगावधान राखत दरवाजा लोकलचा दरवाजा बंद केला.